इस्लामपूरच्या महादेवनगरची भाजी मंडई पूर्ववत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:27 IST2021-02-10T04:27:38+5:302021-02-10T04:27:38+5:30
इस्लामपूर : शहराच्या महादेवनगर परिसरातील भाजी मंडई पूर्ववत सुरू करा, अशी मागणी महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात यांनी नगरपरिषदेचे ...

इस्लामपूरच्या महादेवनगरची भाजी मंडई पूर्ववत सुरू करा
इस्लामपूर : शहराच्या महादेवनगर परिसरातील भाजी मंडई पूर्ववत सुरू करा, अशी मागणी महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडे केली आहे. १४ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ही मंडई काही दिवस सुरू होऊन बंद पडली, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
इस्लामपूर हायस्कूलच्या पाठीमागील महादेवनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, अनंतनगर,राजेबागेस्वारनगर, निनाईनगर, शाहूनगर येथील नागरिकांची सोय व्हावी म्हणून या मंडईची उभारणी लाखो रुपये खर्च करून नगरपालिकेने केली आहे. शहरातील इतर भागात जर अत्याधुनिक मंडई बांधून तिथे शेतकरी व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी प्रवृत्त केले जात असेल तर तसेच प्रयत्न महादेवनगरसह परिसरासाठीही नगरपालिका प्रशासनाने करावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी नगरसेवक चेतन शिंदे, माजी नगरसेवक कपिल ओसवाल, गजानन फल्ले, सतीश पवार, मन्सूर वाठारकर,धीरज कबुरे उपस्थित होते.
फोटो- ०९०२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर निवेदन न्यूज १
इस्लामपूर येथील महादेवनगर परिसरातील मंडई सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन महाडिक युवा शक्तीचे सुजित थोरात यांनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांना दिले. यावेळी चेतन शिंदे, कपिल ओसवाल, गजानन फल्ले उपस्थित होते.