शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील भाष्टेवस्ती-कोकणेवाडी दुर्घटनेच्या छायेखाली; माळीण, इर्शाळवाडी सारखीच परिस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:49 IST

कायमस्वरूपी उपाययोजना अथवा स्थलांतर केव्हा होणार, याची प्रतीक्षा

विकास शहाशिराळा : पुणे जिल्ह्यातील माळीण, रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेसारखीच परिस्थिती शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरातील आरळापैकी भाष्टेवस्ती तसेच कोकणेवाडी येथे निर्माण झाली आहे. या दोन वस्त्या दुर्घटनेच्या छायेखाली वावरत असून, वाडीलगतच्या डोंगरांना भेगा पडून ते खचू लागले आहेत. जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी पाहणी केली आहे. या वस्तीची कायमस्वरूपी उपाययोजना अथवा स्थलांतर केव्हा होणार, याची प्रतीक्षा आहे.२०१९ मध्ये तहसीलदार गणेश शिंदे यांनी खचलेल्या डोंगराची पाहणी केली होती. परिस्थिती पाहिल्यावर तातडीने भूवैज्ञानिक यांना बोलविण्याचा निर्णय घेतला होता. तहसीलदार शिंदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे, कनिष्ठ वैज्ञानिक जयंत मिसाळ यांनी पाहणी केली होती. तेव्हा एक थर कठीण दगडापासून सुटलेला आहे. याठिकाणी ओढ्यामुळे डोंगराची झीज वेगाने होत आहे. पाण्यामुळे माती व मुरूम वाहून जात आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाली की डोंगराचा भाग केव्हाही सुटू शकतो. हा भाग सुटल्यास डोंगर पायथ्याशी असलेल्या चार घरांना व शाळेस मोठा धोका आहे.भाष्टेवाडी वस्ती येथे दोन ओढ्यांमध्ये जी सात घरे आहेत, तेथील नागरिक व कोकणेवाडी येथील चार घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहायला जावे लागते.

जळकेवाडी, बेर्डेवाडी, खोतवाडी परिसरातही थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी दरवर्षी तीन ते पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. दोन-तीन वर्षांपासून येथे पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथे भूस्खलनाचे संकट आहे. येथील कुटुंबांचे कायमस्वरूपी स्थलांतर होणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे एप्रिलमध्ये मागणी केली आहे. - आमदार मानसिंगराव नाईक, विधानसभा सदस्य, शिराळाकोकणेवाडी डोंगरास पडलेल्या भेगांचा भाग व त्यावरच्या भागाची पाहणी केली असता ३०० ते ४०० मीटर लांब, १०० मीटर रुंद तसेच २ ते १० मीटर खोल असा डोंगराचा भाग मूळ कठीण खडकापासून सुटलेला आहे. ओढ्यामुळे या भागाची वेगाने झीज होत आहे. मोठा पाऊस पडला तर हा भाग सुटून चार घरे व शाळेस मोठा धोका निर्माण होईल. - दिवाकर धोटे, तत्कालीन वरिष्ठ भूवैज्ञानिक

टॅग्स :Sangliसांगलीlandslidesभूस्खलनRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण