शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या विक्रमानंतर शिक्षणमंत्री सरसावले, 'मॅसेज'साठी पालकांना मोबाइलसमोर बसवले  

By संतोष भिसे | Updated: March 5, 2024 13:49 IST

महावाचन चळवळीचे फर्मान, प्रत्येक मूल वाचू लागेल अशी अपेक्षा

संतोष भिसेसांगली : पालक अभिप्रायाच्या सेल्फींच्या ऑनलाइन विक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात विद्यार्थी व पालकांना कसरत करायला लावली. त्याचे ओझे शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांच्या खांद्यावरून उतरण्यापूर्वीच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या महावाचन चळवळीचे फर्मान निघाले. रविवारी (दि. ३) राज्यभरातील लाखो पालक आणि विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा संदेश ऐकत मोबाइलसमोर बसावे लागले.

केसरकर यांनी रविवारी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. ‘चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!’ या थीमखाली महावाचन चळवळ राबविली. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेंतर्गत हा उपक्रम ऐच्छिक होता; पण शिक्षण विभागाने तो अप्रत्यक्षरीत्या सक्तीने राबविला. त्यामुळे रविवारची सुटी एन्जॉय करण्याऐवजी पालक व विद्यार्थ्यांना सक्तीने मोबाइलसमोर यू-ट्यूब पाहत बसावे लागले. कार्यक्रम १०:५० ते ११:१५ या वेळेत झाला. थेट प्रक्षेपणादरम्यान कोणालाही लेफ्ट होण्याची परवानगी नव्हती.‘संबंधित प्रत्येक घटकाने मंत्र्यांचा संदेश वेगवेगळ्या मोबाइलवर पूर्ण वेळ पाहायचा आहे. यू-ट्यूब लिंकवर वेळेपूर्वी १० मिनिटे जॉइन व्हायचे आहे. व्हिडीओ पूर्ण झाल्यानंतर धन्यवादचा संदेश आल्यावरच यू- ट्यूब बंद करायचे आहे,’ असे फर्मान प्रशासनाने जारी केले होते. ते डावलण्याची कोणाचीच बिशाद नव्हती. हे ऑनलाइन लाइव्ह संबोधन पाहताना संबंधित घटकांनी आपले नाव, शाळा, कार्यालयाचा तपशील व अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये टाकण्याची सूचनाही केली होती.

अनाकलनीय दावामंत्र्यांच्या या अभियानामुळे २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील इयता तिसरीपर्यंतचे प्रत्येक मूल समजपूर्वक ओघवते वाचन करू लागेल व इयत्ता आठवीमधील प्रत्येक मूल शिकण्यासाठी वाचू शकेल, असा अनाकलनीय हेतूही महावाचन अभियानामध्ये प्रशासनाने नोंदविला होता. अभियानाचा प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिक दर दिवशी १० मिनिटे नवीन व सकारात्मक गोष्टींचे वाचन करेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली होती.

टॅग्स :SangliसांगलीStudentविद्यार्थीChief Ministerमुख्यमंत्री