शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जतमधील वंचित गावांच्या योजनेस तत्वत: मंजुरी : संजयकाका पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 13:00 IST

सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या जत तालुक्यातील ६५ गावांचा समावेश असलेल्या म्हैसाळ सिंचनच्या विस्तारित प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजतमधील वंचित गावांच्या योजनेस तत्वत: मंजुरी : संजयकाका पाटील मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर, कायमस्वरुपी प्रश्न निकाली निघणार

सांगली : सिंचन योजनांपासून वंचित असलेल्या जत तालुक्यातील ६५ गावांचा समावेश असलेल्या म्हैसाळ सिंचनच्या विस्तारित प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, सिंचन योजनांचा लाभ मिळू शकणारी, पण योजनेत समाविष्ट नसलेली ४८ गावे आणि सुधारित प्रस्तावीत मान्यतेमध्ये समाविष्ट असलेली १७ गावे, अशी एकूण ६५ गावे म्हैसाळ योजनेच्या विस्तारित प्रकल्पात समाविष्ट केली आहे.

हा अहवाल शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर त्यांनी अहवालाची पाहणी करून त्यास तत्वत: मान्यता दिली. बंदिस्त जलवाहिन्यांमुळे जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या माध्यमातून ६00 कोटी रुपयांची बचत झाली असल्याने तेवढ्याच बचतीच्या रकमेत ६५ गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार असल्याची बाब आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडली. मुख्यमंत्र्यांनीही त्यास हिरवा कंदिल दर्शविला आहे.राज्याच्या तांत्रिक समितीकडे आता हा प्रस्ताव तपासणीसाठी गेला असून येत्या दीड महिन्यात त्यांच्याकडून मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही या योजनेबद्दल आशावादी आहोत. तांत्रिक बाबींचा अभ्यास करून सर्व गोष्टींचा विचार करून पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी एक सक्षम आराखडा तयार केला आहे.

सुमारे ६00 ते ७00 कोटी रुपयांचा आराखडा असून नाबार्डकडून कर्जस्वरुपात यास पैसे मिळू शकतात. तरीसुद्धा या कर्जाचा कोणताही भार लाभार्थी गावातील जनतेला सोसावा लागणार नाही. जत तालुक्यातील एकही गाव आता सिंचन योजनेपासून वंचित राहणार नाही.कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेला अनेक मर्यादा आहेत.

योजनेतून केवळ २0 ते २२ गावांनाच केवळ रब्बी हंगामासाठीच लाभ होऊ शकतो. त्यामुळे या योजनेपेक्षा आम्ही म्हैसाळच्या तिसऱ्या टप्प्यातून विस्तारीत योजना करून वंचित गावांना पाणी देण्यास प्राधान्य दिले, असे पाटील म्हणाले.खानापूरसाठीही प्रयत्न करूखानापूर तालुक्यातील वंचित गावांनाही सिंचन योजनेतून पाणी देण्याबाबत विचार सुरू आहे. जत तालुक्यातील गावांप्रमाणे त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठीही आम्ही निश्चित प्रयत्न करू, असे संजयकाका पाटील म्हणाले.

टॅग्स :DamधरणSangliसांगली