‘साई’चे सूत्रधार पडद्यामागे

By Admin | Updated: May 25, 2015 00:24 IST2015-05-24T23:58:46+5:302015-05-25T00:24:22+5:30

इस्लामपुरात संतापाची लाट : स्थानिक तरुणांना अडकविण्याचा प्रयत्न

Under the 'Saai' basement screen, behind the scenes | ‘साई’चे सूत्रधार पडद्यामागे

‘साई’चे सूत्रधार पडद्यामागे

इस्लामपूर : ‘लोकमत’ने साई एन्टरप्रायझेसच्या भूलभुलैया योजनेचा पर्दाफाश केल्यानंतर, यामध्ये पैसे गुंतविलेल्या सुशिक्षित बेरोजगारांनी पैसे परत मिळविण्यासाठी ‘साई’च्या कार्यालयाकडे धाव घेतली. परंतु मुख्य सूत्रधार मात्र पडद्यामागेच असून येथे असलेल्या एका कर्मचारी मुलीशी संपर्क साधला असता, ‘आमचे सर येतील’, असे उत्तर देऊन युवकांची बोळवण केली जात आहे.
साई एन्टरप्रायझेसच्या सूत्रधारांनी स्थानिक वृत्तपत्रातून परिपत्रक टाकले होते. यामध्ये शहरातील सुशिक्षित बेरोजगारांना, घरबसल्या ३ हजार रुपये मिळवा, अशी जाहिरात केली होती. ही जाहिरात वाचून अनेक बेरोजगार युवक, युवती व महिला या योजनेकडे आकर्षित झाल्या. दरम्यान, या कार्यालयातील कामकाज पाहण्यासाठी स्थानिक बारावी ते पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आली होती. स्थानिक विद्यार्थ्यांच्या ओळखीचा फायदा घेऊन त्यांच्या परिसरातील सुशिक्षित बेकार युवक—युवतींना या योजनेमध्ये सामील करुन घेऊन लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे.
हे कार्यालय आझाद चौकातील एका इमारतीच्या तळघरात छोट्याशा जागेत आहे. तेथे कोणत्याही प्रकारचा फलक नाही. व्यवसाय करण्याचा परवानाही नाही. याठिकाणी इंग्रजी माध्यमातून शिकलेली मुलगी कामावर आहे. बसस्थानक परिसरातील सिध्दनाथ हॉलच्या मालकांशी संपर्क साधला असता, १५ ते २0 दिवसात येथे कोणताही सेमिनार झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)

उडवाउडवीची उत्तरे देऊन बोळवण
या कार्यालयास आमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता, ही मुलगी येणाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठवत होती. परंतु ज्यांनी या योजनेतील ग्रंथ पुनर्लिखित केले आहेत, ते ग्रंथ जमा करण्यासाठी येत आहेत. तसेच अनेकजण पैसे मागण्यासाठी येत आहेत. एकूणच, यातील सूत्रधार नामानिराळा राहिला असून स्थानिक नोकरी करणारेच यामध्ये भरडले जात आहेत.

Web Title: Under the 'Saai' basement screen, behind the scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.