थकबाकी वसुलीसाठी अंकलखोपला लकी ड्रॉ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:41 IST2021-02-23T04:41:47+5:302021-02-23T04:41:47+5:30
कर भरणाऱ्या नागरिकांतून लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे जाहीर केली जात आहेत. यात सोन्याची अंगठी, टेबल फॅनसह बक्षिसांची ...

थकबाकी वसुलीसाठी अंकलखोपला लकी ड्रॉ
कर भरणाऱ्या नागरिकांतून लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे जाहीर केली जात आहेत. यात सोन्याची अंगठी, टेबल फॅनसह बक्षिसांची खैरात जाहीर केली आहे.
वसुलीला गेल्यावर अनेक कारणे करदात्यांकडून दिली जातात. जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा अनुभव येत असल्याने आणि वसुली ग्रामपंचायतीची असली तरी ‘कारभारी मात्र वाईटपणाचे धनी’ अशी अवस्था झाल्याने कर्मचारीही हतबल होतात. त्यामुळे अंकलखोप ग्रामपंचायत प्रशासनाने अभिनव शक्कल लढवली आहे. सरपंच अनिल विभुते, उपसरपंच विनय पाटील यांच्या संकल्पनेतून ही आगळीवेगळी योजना सुरू झाली. प्रमुख मार्गदर्शक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, नागरिकांची बैठक घेऊन ही योजना राबवण्याचे ठरवले. येत्या मार्चपासून ग्रामस्थांसाठी आणखी काही योजना राबविण्यात येणार असल्याचे सरपंच विभुते यांनी सांगितले.