शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

बुडणाऱ्या पुतणीला वाचवायला काकांनी विहिरीत उडी मारली; दुर्दैवानं दोघंही बुडाले; सांगलीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 11:53 IST

बुडालेल्या सौदर्या हिला डुबकी घेऊन चुलते मनोज शेसवरे यांनी बाहेर काढले. विहिरीच्या पायरीवरुन वर येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले.

शिरढोण : अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे विहिरीत पडलेल्या पुतणीला वाचवण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतणीचा बुडून मृत्यू झाला. मनोज भास्कर शेसवरे (वय ४३) आणि सौंदर्या वैभव शेसवरे (१६, दोघेही रा. अग्रण धुळगाव) अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात घटनेची नाेंद आहे.घटनेची अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेली सौंदर्या व तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी मायलेकी दोघीही विहिरीत उतरल्या होत्या. विहिरीत उतरलेल्या सौंदर्या हिने कळशीत पाणी भरले व वरती येत असतानाच तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. काही समजण्याच्या आतच ती विहिरीत पडल्याने सौंदर्याच्या आईने आरडाओरडा केला.तेवढ्यात सौंदर्याचा चुलते असलेले मनोज शेसवरे हे धावत आले आणि विहिरीमध्ये सौंदर्याला वाचवण्यासाठी उडी मारली. मनोज हे पाण्यामध्ये आल्यावर गटांगळ्या घेत असलेली सौंदर्या हिने मनोज यांना पाण्यामध्ये पटकन मिठी मारली. सौंदर्याने ही घट्ट मिठी मारल्याने मनोज शेसवरे यांना हातपाय हलवता आले नाही. त्यामुळे त्यांना पोहता आले नाही. यामुळे दोघेही विहिरीत बुडाले. सौंदर्याच्या आईने परत आरडाओरड केली. आवाज ऐकून शेजारी असलेल्या वस्तीवरील ग्रामस्थ आले, पण उशीर झाल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय येथे या दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.पाण्यातून बाहेर काढले, पण पुन्हा पाय घसरलाबुडालेल्या सौदर्या हिला डुबकी घेऊन चुलते मनोज शेसवरे यांनी बाहेर काढले. विहिरीच्या पायरीवरुन सौदर्याला उचलून मिठीत घेऊन वर येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. घाबरलेल्या सौदर्याने अगदी घट्ट मारलेली मिठी आणि थकव्यामुळे मनोज यांना अखेर श्वास सोडावा लागला. मनोज हे भारतीय सैन्यात होते. काही वर्षापूर्वीच ते निवृत्त झाले होते.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू