उमदीत उपसरपंच रमेश हळके यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:49 IST2021-02-06T04:49:46+5:302021-02-06T04:49:46+5:30
रमेश हळके यांचा दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उपसरपंच पदाच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र रमेश हळके यांनी राजीनामा देण्याबाबत ...

उमदीत उपसरपंच रमेश हळके यांचा राजीनामा
रमेश हळके यांचा दीड वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उपसरपंच पदाच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र रमेश हळके यांनी राजीनामा देण्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली.
मात्र उमदी येथे सर्वसाधारण पुरुष यासाठी सरपंचपद आरक्षण पडल्याने पुन्हा राजकीय वातावरण तापत उपसरपंच बदलाच्या हालचाली सुरू झाल्या. वहाब मुल्ला, निवृत्ती शिंदे, डॉ. एल. बी. लोणी, बंडा शेवाळे यांनी रमेश हळके यांना राजीनामा देण्यास राजी केले.
हळके यांचा राजीनामा सदस्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भीमू कोरे, नारायण ऐवळे, सिद्धू पुजारी, बाबू सावंत, चंदू नागणे, आदी मान्यवर उपस्थित होते. आता कल्लाव्वा तोरणे उपसरपंच पदासाठी प्रबळ दावेदार आहेत.