उमदीच्या वृद्धेचा पुतण्याकडून कर्नाटकात नेऊन खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST2021-08-15T04:28:16+5:302021-08-15T04:28:16+5:30

उमदी : उमदी (ता. जत) येथील वृध्देचा तिच्याच पुतण्याने कर्नाटकात कोलार येथे नेऊन कोयत्याने वार करून खून केल्याची घटना ...

Umadi's old man murdered by his nephew in Karnataka | उमदीच्या वृद्धेचा पुतण्याकडून कर्नाटकात नेऊन खून

उमदीच्या वृद्धेचा पुतण्याकडून कर्नाटकात नेऊन खून

उमदी : उमदी (ता. जत) येथील वृध्देचा तिच्याच पुतण्याने कर्नाटकात कोलार येथे नेऊन कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. खुनाची घटना गुरुवारी घडली. सुशीलाबाई राजाराम माने (वय ७४) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा पुतण्या दादासाहेब माने फरार झाला आहे.

सुशीलाबाई माने यांना गुरुवारी सायंकाळी चारच्यासुमारास पुतण्या दादासाहेब माने याने भाड्याच्या मोटारीने विजापूर (विजयपूर) येथे नेले. सोबत मोटारचालकही होता. दादासाहेबने विजयपुरात एक कोयता विकत घेतला. पुढे कोलार येथे उतरून सुशीलाबाई यांना पाहुण्यांच्या घरी सोडून येतो, असे सांगून चालकाला थांबवून तो गेला. त्यानंतर दोन तासांनी तो आला. सुशीलाबाई यांना पाहुण्यांकडे सोडून आलो, असे त्याने चालकाला सांगितले. मात्र त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग दिसल्याने चालकाला संशय आला. चालकाने गावी परत आल्यावर ही घटना चडचण पोलिसांना सांगितली. चालक मित्रांनाही त्याने ही माहिती दिली.

दरम्यान, सुशीलाबाई यांच्या जत येथील जावयाने त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद उमदी पोलिसांत दिली होती. त्यावरून उमदी पोलिसांनी माग काढला. मोटारचालकाला बोलावून घेऊन चौकशी केली. त्यानंतर शनिवारी कर्नाटकातील कोलार येथे जाऊन शोध घेतला असता, सुशीलाबाई माने यांचा मृतदेह उसाच्या फडात सापडला. त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे दिसून आले. संशयित दादासाहेब माने फरार झाला आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली नव्हती. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलिसांना सहकार्य मिळत नसल्याने उमदी पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अडचणी आल्या. त्यामुळे तपासामध्ये विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Umadi's old man murdered by his nephew in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.