उमदी जि. प. गट, तीन पंचायत समिती गणासाठी मार्चमध्ये मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:50 IST2021-02-06T04:50:21+5:302021-02-06T04:50:21+5:30
निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार ...

उमदी जि. प. गट, तीन पंचायत समिती गणासाठी मार्चमध्ये मतदान
निवडणूक आयोगाने तयार केलेल्या व १५ जानेवारी २०२१ रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. निवडणूक विभाग व निर्वाचक गण विभाजित केल्यानंतर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येतील. त्यावर २६ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर ५ मार्च रोजी निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या अंतिम करण्यात येतील. मतदान केंद्रांची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या १० मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहेत.
उमदी जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले आमदार विक्रम सावंत हे जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यामुळे उमदी जि. प. गटाची जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम प्रसिध्द केल्यामुळे अनेक इच्छुकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. कवठे महाकाळ तालुक्यातील देशिंग, शिराळा तालुक्यातील मणदूर, मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज या पंचायत समिती गणासाठी मार्च महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.