उमदी जि. प. गटाची पाेटनिवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार : निवृत्ती शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:48 IST2021-02-21T04:48:47+5:302021-02-21T04:48:47+5:30

शिंदे म्हणाले की, उमदी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे वर्चस्व आहे. जनतेतून सर्वाधिक थेट सरपंच काँग्रेस पक्षातून निवडून आले आहेत. ...

Umadi Dist. W. Congress to contest group by-elections vigorously: Nivruti Shinde | उमदी जि. प. गटाची पाेटनिवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार : निवृत्ती शिंदे

उमदी जि. प. गटाची पाेटनिवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार : निवृत्ती शिंदे

शिंदे म्हणाले की, उमदी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे वर्चस्व आहे. जनतेतून सर्वाधिक थेट सरपंच काँग्रेस पक्षातून निवडून आले आहेत. उमदी हे जिल्हा परिषद मतदारसंघातील मोठे गाव असून याठिकाणी देखील काँग्रेसचाच सरपंच निवडून आला आहे. येथेही काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे उमदी जिल्हा परिषद मतदारसंघावर काँग्रेसचाच हक्क आहे. ही पोटनिवडणूक आम्ही आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याचा निर्धार केला आहे. बंडा शेवाळे, संतोष अरकेरी, उमेश पुजारी, रमेश हळके व स्वतः मी अशा पाचजणांची उमदी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी असून आमदार विक्रम सावंत व पक्ष ज्यांना उमेदवारी देईल त्यांच्या पाठीशी सर्व पक्षांतील नेतेमंडळी व कार्यकर्ते राहणार आहेत.

यावेळी वहाब मुल्ला, बंडा शेवाळे, संतोष अरकेरी, उमेश पुजारी, अक्षय भोसले, सिद्धू पुजारी, शेट्याप्पा इम्मणवर उपस्थित होते.

Web Title: Umadi Dist. W. Congress to contest group by-elections vigorously: Nivruti Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.