शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत उद्धवसेनेपुढे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान, पहिल्या फळीतील सर्वच पदाधिकाऱ्यांचा रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 16:01 IST

सांगली : उद्धवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेसेनेचे शिवबंधन बांधले. त्यामुळे उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पडले ...

सांगली : उद्धवसेनेच्या आजी-माजी जिल्हाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदेसेनेचे शिवबंधन बांधले. त्यामुळे उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पडले आहे. पहिल्या फळीतील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकल्यामुळे उद्धवसेनेच्या जिल्ह्यातील अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उद्धवसेना सांभाळणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्यामुळे उर्वरित उद्धवसेना सैरभैर झाली आहे. त्यांना धीर देण्यासाठी काहींनी पुढाकार घेतला आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून जिल्ह्यात अनेक पदाधिकारी एकनिष्ठपणे काम करत होते. परंतु, गेल्या काही वर्षात राज्यातील उलथापालथ झाल्यानंतर येथेही त्याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. ‘आयाराम - गयाराम’ जवळपास सर्वच पक्षात पाहायला मिळत आहेत. शिवसेना ही उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात विभागली गेल्यानंतर जिल्ह्यातही तेच चित्र पाहायला मिळाले. येथेही निष्ठावान आणि गद्दारीचे आरोप - प्रत्यारोप झाले. उद्धवसेना आणि शिंदेसेना या दोन्ही सेनेतही पदाधिकारी होते.उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात किल्ला लढवत ठेवला होता. परंतु, नुकतेच शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेनेला भले मोठे खिंडार पाडले. जिल्हाप्रमुख संजय विभुते, माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, युवासेनेचे ऋषिकेश पाटील, मिरजेचे प्रा. सिद्धार्थ जाधव, सुनीता मोरे यांच्यासह काही तालुकाप्रमुखांनी उद्धवसेनेची साथ सोडून शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धवसेनेत सध्या पहिल्या फळीतील कोणीही पदाधिकारी शिल्लक राहिले नाहीत.एकाचवेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धवसेना सोडल्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. आता दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांना जिल्हा सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने एकत्र येऊन कार्यकर्त्यांना धीर दिला. कितीही पदाधिकारी पक्ष सोडून गेले तरी उद्धवसेना जिल्ह्यात कार्यरत राहील, असे त्यांनी सांगितले. परंतु, ते किती काळ आणि कोणाच्या भरवशावर टिकून राहणार? हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

उद्धवसेनेचा मिरजेत यल्गारसांगली - मिरज विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मिरजेत एकत्र येऊन यल्गार पुकारला. ‘उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवसैनिक हा शिवसेनेचा प्राण असल्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असे सांगण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर, महादेव मगदूम, तानाजी सातपुते, विष्णू पाटील, सुजाता इंगळे, संजय काटे, चंद्रकांत मैगुरे, महादेव हुलवान, विराज बुटाले, विठ्ठल संकपाळ, किरण पवार, ओंकार देशपांडे, गणेश लोखंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना