शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी राजू शेट्टींना ‘मातोश्री’चे पाठबळ मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:42 IST

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीकडे याठिकाणी उमेदवार नसल्याचे चित्र

अशोक पाटीलइस्लामपूर :  राजू शेट्टी यांनी एकला चलोची भूमिका घेतली आहे. परंतु, शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील तत्कालीन शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर यांच्याबरोबर असलेली शेट्टी यांची जवळीक पाहता आगामी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांच्या भूमिकेला मातोश्रीवरून आशीर्वाद मिळण्याचे संकेत मिळत आहेत.माजी खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी हातकणंगले मतदारसंघातून शड्डू ठोकला आहे, तर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना भाजप-शिवसेना युतीकडून उमेदवारी मिळणार असे ठामपणे त्यांचे समर्थक सांगताहेत. पुन्हा एकदा माने आणि शेट्टी यांच्यात दुरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत.

राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या महाआघाडीकडे याठिकाणी उमेदवार नसल्याचे चित्र आहे. शेट्टी यांची भूमिका महत्त्वाची आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीशी केलेली सोयरीक स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महागात पडली होती, तर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कोट्यातून शेट्टी यांना विधान परिषदेवर घेण्याचा डाव भाजपने हाणून पाडला होता. याचाही राग शेट्टी यांच्या मनात आहे.

भाजप व राष्ट्रवादीला लांब ठेवूनच लोकसभा लढवण्याचा निर्धार शेट्टींनी केला असला तरी एकला चलोच्या भूमिकेला एखाद्या गटाची ताकद घ्यावीच लागणार, अशी चर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून आहे.नेते एकत्र आले तर...उद्धव ठाकरे समर्थक शिरोळ मतदारसंघातील माजी आमदार उल्हास पाटील, हातकणंगले मतदारसंघातील माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि राजू शेट्टी नेहमीच एकत्रित व्यासपीठावर दिसतात. शेट्टी यांच्या दूध संघात उल्हास पाटील संचालक आहेत. शिरोळ तालुक्यातील विकास आघाडीचे नेतृत्व शेट्टी व उल्हास पाटील यांच्याकडे आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेप्रणीत आमच्याच पक्षाचा उमेदवार असेल. गत निवडणुकीत धैर्यशील माने यांच्या पाठीशी आम्ही होतो. माने यांची भूमिका बदलली आहे.  मातोश्रीवरून आदेश येईल तो शिरसावंद्य मानू. - अभिजित पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका ‘एकला चलो’ची आहे. हातकणंगले व इतर लोकसभा मतदारसंघात आमच्या संघटनेला पाठिंंबा मिळत आहे. आगामी काळात समीकरणे काय असतील हे सांगता येत नाही. योग्य वेळी भूमिका स्पष्ट होईल. - भागवत जाधव, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाRaju Shettyराजू शेट्टीUddhav Thackerayउद्धव ठाकरे