शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मिरजेत उद्धवसेनेकडून तानाजी सातपुते यांना उमेदवारी; शिराळा, जतला भाजपमध्ये तर सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 16:32 IST

सांगली : महाविकास आघाडीअंतर्गत मिरजेच्या जागावाटपाचा संभ्रम रविवारी दूर झाला. याठिकाणी उद्धवसेनेने तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी ...

सांगली : महाविकास आघाडीअंतर्गतमिरजेच्या जागावाटपाचा संभ्रम रविवारी दूर झाला. याठिकाणी उद्धवसेनेने तानाजी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लाेष केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व काँग्रेसमधील इच्छुकांच्या पदरी निराशा आली. तसेच, उमेदवारीवरून शिराळा व जतमध्ये भाजपची आणि सांगलीत काँग्रेसमधील इच्छुकांनी बंड पुकारले आहे.मिरजेच्या जागेसाठी आघाडीतील तिन्ही पक्षांत संघर्ष होता. शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व उद्धवसेनेमध्ये रस्सीखेच सुुरू होती. अखेर ही जागा उद्धवसेनेला देण्यात आली. मागील निवडणुकीत ही जागा आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेली होती. आता ती महाविकास आघाडीतील उद्धवसेनेला गेली आहे. त्यामुळे उद्धवसेनेच्या पदरात जिल्ह्यातील एकमेव जागा पडली आहे.खानापूर मतदारसंघासाठीही राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष व उद्धवसेनेमध्ये रस्सीखेच सुुरू आहे. भाजपचे मंत्री सुरेश खाडे विरुद्ध उद्धवसेनेचे तानाजी सातपुते अशी ही लढत होणार आहे. बंडखोरी होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

सांगलीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये, तसेच जत व शिराळा मतदारसंघात भाजपमध्ये गटबाजी उफाळली आहे. पक्षाने जाहीर केलेली उमेदवारी मान्य नसल्याने काँग्रेसमधील इच्छुक जयश्री पाटील, शिराळ्यातील भाजपचे इच्छुक सम्राट महाडिक व जतमध्ये तम्मनगौडा रवी-पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.

सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरीसांगलीत रविवारी जयश्रीताई पाटील यांनी त्यांच्या गटाची बैठक घेत बंडखोरी जाहीर केली. सोमवारी, २८ ऑक्टोबरला त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची या मतदारसंघातील डोकेदुखी वाढणार आहे.

शिराळ्यात भाजपमध्ये फूटशिराळा मतदारसंघात भाजपने सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या महाडिक गटाने बैठक व मेळावा घेत बंडखोरीचे निशाण फडकाविले. त्यामुळे भाजपमध्ये आता दोन गट पडले आहेत.

जतमध्ये भाजपच्या नाराजांची स्थानिक आघाडी..जतमध्ये गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांनी बंड पुकारले आहे. स्थानिक आघाडी करून निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. त्यानुसार स्थानिक आघाडीच्या वतीने तम्मनगौडा रवी-पाटील अर्ज दाखल करणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४miraj-acमिरजUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024