जतमध्ये बेवनूर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:02+5:302021-09-21T04:29:02+5:30

बेवनूर येथे डी. बी. एल. कंपनीतर्फे उत्खनन सुरु आहे. यामुळे बोअर ब्लास्टमुळे वस्तीत येणाऱ्या दगडाने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण ...

Typical fast of Bevanur villagers in Jat | जतमध्ये बेवनूर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

जतमध्ये बेवनूर ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

बेवनूर येथे डी. बी. एल. कंपनीतर्फे उत्खनन सुरु आहे. यामुळे बोअर ब्लास्टमुळे वस्तीत येणाऱ्या दगडाने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे झालेले नुकसान व नंतर लोकवस्तीमध्ये दगड येणार नाहीत म्हणून संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांकडून लेखी हमी प्रमाणपत्र मिळावे, ग. नं. २५१ मधील उत्खनन क्षेत्र शेजारी सेफ झोन सोडला नसल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान व सेफ झोन ज्ञापन जमीन खरेदी करुन घेणे व नुकसान टाळावे, २५००० हजार ब्रास उत्खनन परवाना खनिकर्म कडून असताना कंपनीने जास्त उत्खनन केल्याचे दिसून येते. त्याबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यामार्फत पंचनामा करुन कारवाई व्हावी. अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

उपोषणास नाथा पाटील, संभाजी ब्रिगेडचे श्रेयस नाईक, दीपक पाटणकर, इर्शाद तांबोळी, संदीप नाईक, बापूसो टेंगले, संदीप शिंदे, तानाजी शिंदे, ओंकार शिंदे, प्रमोद काटे, माणिक वाघमोडे, आप्पासाहेब खांडेकर, बबलू खांडेकर उपस्थित होते.

200921\img20210920120221.jpg

महामार्गाचे काम करणाऱ्या डी.बी. एल कंपनीविरोधात जतमध्ये उपोषण

Web Title: Typical fast of Bevanur villagers in Jat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.