इस्लामपुरात कॉँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:26 IST2021-03-27T04:26:36+5:302021-03-27T04:26:36+5:30

इस्लामपूर येथे कॉँग्रेसच्या वतीने भारत बंदला पाठिंबा म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जितेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश पाटील, ...

Typical Congress hunger strike in Islampur | इस्लामपुरात कॉँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

इस्लामपुरात कॉँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

इस्लामपूर येथे कॉँग्रेसच्या वतीने भारत बंदला पाठिंबा म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी जितेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र शिंदे, आनंदराव पाटील उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : केंद्र सरकारच्या तीन काळ्या कृषी कायद्यांसह कामगार कायदे आणि महागाईच्या मुद्दावर विविध शेतकरी संघटनांनी मोदी सरकारच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदला येथील कॉँग्रेसच्या वतीने पाठिंबा म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या नेतृृत्वाखाली कॉँग्रेस कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पक्षाच्या आदेशावरून गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस दिल्लीच्या सीमावर कृषी कायदे रद्द करण्यासाठी ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य प्रकाश पाटील, पं. स. सदस्य आनंदराव पाटील, अ‍ॅड. आर. आर. पाटील, युवक अध्यक्ष राजू वलांडकर, जयदीप पाटील, अक्षय फाटक, अकीब जमादार उपस्थित होते.

Web Title: Typical Congress hunger strike in Islampur