मद्यधुंद तलाठ्याचा धिंगाणा गुड्डापुरातील प्रकार : पोलिसांकडून अटकेची कारवाई
By Admin | Updated: May 9, 2014 00:12 IST2014-05-09T00:12:05+5:302014-05-09T00:12:05+5:30
जत : तालुक्यातील गुड्डापूर येथील गावकामगार तलाठी के. पी. साळुंखे यांनी मद्य प्राशन करून तलाठी भवन व तहसील कार्यालयात धिंगाणा घातला.

मद्यधुंद तलाठ्याचा धिंगाणा गुड्डापुरातील प्रकार : पोलिसांकडून अटकेची कारवाई
जत : तालुक्यातील गुड्डापूर येथील गावकामगार तलाठी के. पी. साळुंखे यांनी मद्य प्राशन करून तलाठी भवन व तहसील कार्यालयात धिंगाणा घातला. याप्रकरणी त्याच्याविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी साळुंखे यास अटक केली आहे. ही घटना आज (गुरूवार) सायंकाळ साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणूक कार्यकाळात के. पी. साळुंखे यांनी व्यवस्थित काम केले नाही, म्हणून त्यांचा तेथील कार्यभार काढून घेण्यात आला आहे. निवडणूक कामात हायगय केली म्हणून प्रशासकीय पातळीवर त्यांना निलंबित करण्याची कार्यवाही सुरू होती. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान ते तलाठी भवन कार्यालयात मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत आले. येथे सात बारा संगणकीकरणाचे काम त्यांनी बंद पाडत पाच-सहा संगणकांच्या वायरी त्यांनी हातांनी ओढून तोडल्या. त्यानंतर जवळच असलेला तहसील कार्यालय परिसरात जाऊन तहसीलदार दीपक वजाळे यांचे नाव घेऊन गोंधळ घालण्यास सुरूवात केली उपस्थित नागरिकांनी त्यांना शांत बसण्यास सांगितले असता ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी साळुंखे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करावी असा आदेश जत पोलिसांना दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मंडल अधिकारी अरूण कणसे यांनी साळुंखे यांच्याविरोधात जत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. (वार्ताहर)