शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात जादूटोणाचा प्रकार: ..अखेर सांगलीतील आटपाडी येथील गेळे दाम्पत्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 12:14 IST

लक्ष्मण सरगर आटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रतंत्र ...

लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडी तालुक्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू असणाऱ्या रुग्णाच्या डोक्यावर हात ठेवून मंत्रतंत्र म्हणून जादूटोणा करत असल्याच्या आरोपावरून आटपाडीतील संजय दादा गेळे व अश्विनी संजय गेळे (रा.बायपास रोड आटपाडी) यांच्यावर अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये संपतराव नामदेव धनवडे यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की सोमवारी (दि.१९) आटपाडी येथील निंबवडे येथील वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागामध्ये रुग्णाचे नातेवाईक असल्याचे खोटी माहिती देऊन विनापरवाना प्रवेश केला. यावेळी रुग्ण सोनाली शिवदास जिरे हिच्या कपाळावरून बोटे फिरवत टॅब मधील मजकूर वाचून शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवून जादूटोणा व भोंदूगिरी केले असल्याचे सीसीटीव्हीमध्ये व्हिडीओ चित्रीकरण झाले आहे. याबाबत गेल्या दोन दिवसांपासून आटपाडी तालुक्यामध्ये खळबळ माजली असून याबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त होत होता. याबाबत प्रसारमाध्यमातून आवाज उठवल्यानंतर अखेर आज, शुक्रवारी आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करीत आहेत. गृह विभागाकडून आटपाडी मध्ये सुरू असणाऱ्या धर्मातरण प्रकरणामध्ये सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधित व्यक्तीचे कारनामे लवकरच उघडकीस येणार आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी