शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

Sangli: ट्रॅक्टर उलटून दोघे तरूण जागीच ठार, एक गंभीर जखमी; शर्यतीसाठी येताना झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:08 IST

ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना वाचवले

जत : जत तालुक्यातील मुचंडी येथे गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मुचंडी-कोट्टलगी रस्त्यावर सकाळी सुमारे आठ वाजता चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे झाला. अभिषेक विनोद आरेकर (वय २२) आणि सलमान सिकंदर मुक्केरी (वय १९ रा. चिकट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर मुत्तू अशोक गौडर (वय २०) हा गंभीर जखमी झाला आहे.चिकट्टी (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील अभिषेक आरेकर, सलमान मुक्केरी व मुत्तू गौडर हे तीन तरुण मुचंडी येथे आयोजित केलेल्या शर्यतीसाठी गुरूवारी सकाळी ट्रॅक्टर घेऊन येत होते. मुचंडीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला घसरून अंदाजे १५ ते २० फूट खोल उलटा झाला. या भीषण अपघातात अभिषेक आणि सलमान या दोघांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुत्तू गौडर हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जत पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमी मुत्तू याला बाहेर काढण्यात आले. मृत दोघांना बाहेर काढून पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅक्टर पूर्णपणे चक्काचूर झाला असून, ट्रॅक्टरचे साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणणारे दृश्य होते. मृत दोघे खेळाडू वृत्तीचे होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने चिकट्टी व परिसरात शोककळा पसरली आहे. जत पोलिस ठाण्यात या अपघात प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

शर्यतीसाठी येताना अपघातमुचंडी येथील ट्रॅक्टर शर्यतीसाठी तिघेजण सकाळी येते होते. त्यावेळी अपघाताची दुर्घटना घडली. अपघातानंतर घटनास्थळी याची चर्चा सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Tractor accident kills two, one seriously injured.

Web Summary : Two killed, one injured near Sangli after tractor overturns en route to race. The accident occurred near Muchandi village, Jat taluka. Police are investigating.