कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:33 IST2021-09-07T04:33:01+5:302021-09-07T04:33:01+5:30
मिरज : मिरजेत सांगली रस्त्यावर कंटेनरने चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. १४ ...

कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार
मिरज : मिरजेत सांगली रस्त्यावर कंटेनरने चिरडल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली. १४ चाकी कंटेनरच्या चाकाखाली सापडून चेंदामेंदा झालेल्या दुचाकीस्वाराची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती. या अपघातामुळे सांगली रस्त्यावर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
सांगली रस्त्यावर कर्करोग रुग्णालयाजवळ सांगलीच्या दिशेने दुचाकी क्रमांक (एमएच १० सीझेड ५३४६)ने जाणाऱ्या तरुणाला मागून येणाऱ्या १४ चाकी कंटेनर क्रमांक (एनएल ०१ एसी २५९४)ने चिरडले. अंगावरुन कंटेनर गेल्याने सुमारे ४० वर्षे वयाचा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. या अपघातानंतर बघ्यांची गर्दी जमल्याने एकेरी मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. गांधी चौकी पोलिसांनी बघ्यांची गर्दी हटवली. मृत दुचाकीस्वाराच्या नाव, पत्त्याचा पोलिसांकडून उशिरापर्यंत शोध सुरु होता.