दुचाकी चोरी, रोकड लांबविणाऱ्यासह तीन चोरींचा छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:43+5:302021-03-08T04:24:43+5:30

सांगली : शहरात मोटारसायकल चोरी, जबरी चोरीसह पिग्मी एजंटाचे ४० हजार लांबविणाऱ्यांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. शहरात घडलेल्या तीन ...

Two-wheeler theft, three thefts including cash laundering | दुचाकी चोरी, रोकड लांबविणाऱ्यासह तीन चोरींचा छडा

दुचाकी चोरी, रोकड लांबविणाऱ्यासह तीन चोरींचा छडा

सांगली : शहरात मोटारसायकल चोरी, जबरी चोरीसह पिग्मी एजंटाचे ४० हजार लांबविणाऱ्यांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. शहरात घडलेल्या तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवीत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिसांचे पथक शहरात गस्तीवर असताना तीन गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली.

रात्रीच्यावेळी मारहाण करून जबरदस्तीने चोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. मुस्तफा हुसेन बागवान (वय २३, नदाफ गल्ली, मिरज) आणि रफिक मलीक शेख (२२, रा. ख्वाजा बस्ती, मिरज) अशी संशयितांची नावे आहेत. या दाेघांवरही मिरज शहर, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

दुसऱ्या गुन्ह्यात गणपती पेठ येथे पिग्मी गोळा करताना एजंटाने दुचाकीला ४० हजारांची रोकड असलेली बॅग अडकविली होती. त्यानुसार ही चोरी करणाऱ्या सुनील नामदेव रूपनर (रा. शिवनेरीनगर, कुपवाड) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीमध्ये १७ हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रूपनर हा पण रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर चोरी, मारमारीचे गुन्हे आहेत.

शहरातील जुन्या बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवासमधून दुचाकीची चोरी करणाऱ्या संशयितासही अटक करण्यात आली. विजय बापू कांबळे (वय २२, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, सांगली) असे संशयिताचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश बागाव, दिलीप जाधव, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, विक्रम खोत यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two-wheeler theft, three thefts including cash laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.