बिसूरमधुन दुचाकी चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:17 IST2021-03-30T04:17:32+5:302021-03-30T04:17:32+5:30
सांगली : बिसूर (ता.मिरज) येथील घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

बिसूरमधुन दुचाकी चोरीस
सांगली : बिसूर (ता.मिरज) येथील घरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमोद दिनकर पाटील (वय ४२, गणपती मंदिराजवळ, बिसूर) यांनी फिर्याद दिली.
...
शहरातून चार मोबाइल लंपास
सांगली : शहरातील माळी वस्ती परिसरातील घराच्या उघड्या दरवाज्यातून चोरट्याने प्रवेश करत, चार मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण लाल यादव (२७) या तरुणाने फिर्याद दिली.
...
सांगलीतून दुचाकी चोरीस
सांगली : शहरातील कृष्णा नदी काठावरील वॉटर हाऊसजवळ परिसरात लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अनंत कृष्णाजी कुलकर्णी (वय ५१, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली. अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
...
सायकल चोरट्यास अटक
सांगली : विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौकातून सायकल चोरल्याप्रकरणी एकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. नितीन बाळकृष्ण शिंदे (वय ४१, गव्हर्नमेंट कॉलनी, सांगली) असे संशयिताचे नाव आहेत. त्याच्याकडून आठ हजार रुपयांची सायकल जप्त करण्यात आली. सलीम साहेबलाल मुल्ला (वय २५) यांनी फिर्याद दिली. सलीम मुल्ला हा तरुण मूळचा जत तालुक्यातील व्हसपेठचा आहे. शिक्षणानिमित्त विश्रामबागमधील नाना-नानी पार्कजवळ राहण्यास आहे. शुक्रवार, २६ रोजी दुपारी अडीच्या सुमारास त्याची सायकल चोरीला गेली होती.
...
हॉटेलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीस
सांगली : कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रत्नाच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गौतम नाना कांबळे (वय ५४) यांनी फिर्याद दिली.
...
फळ मार्केटमधून दिवाणजीची दुचाकी चोरीस
सांगली : येथील विष्णू अण्णा फळ मार्केट परिसरातून दिवाणजीची दुचाकी चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवराज साहेबगौड यतनाळ (वय २६) यांनी फिर्याद दिली. पोलीस अधिक तपास करत आहेत.