तासगावजवळ अपघातात दाेघे दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:24 IST2021-01-17T04:24:13+5:302021-01-17T04:24:13+5:30
याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस नलवडे, राहुल माळी व अजय माळी हे तिघेही एकाच दुचाकीवरून कामानिमित्त तासगावला ...

तासगावजवळ अपघातात दाेघे दुचाकीस्वार ठार
याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस नलवडे, राहुल माळी व अजय माळी हे तिघेही एकाच दुचाकीवरून कामानिमित्त तासगावला गेले होते. काम झाल्यानंतर तिघेही दुचाकीवरून तासगावहून पेडकडे परतत हाेते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तासगावपासून दोन किलोमीटर अंतरावर गोटेवाडी रस्त्यालगत अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यालगतच्या कालव्याच्या भिंतीवर जाऊन आदळली. या धडकेत तेजस नलवडे आणि राहुल माळी यांचा जागीच मृत्यू झाला, तर अजय माळी हा किरकाेळ जखमी झाला.
या घटनेची माहिती मिळताच तासगाव पोलिसांचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून नोंद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जखमी अजय माळी याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास तासगाव पोलीस करीत आहेत.
फाेटाे : १५ तेजस नलवडे
फाेटाे : १५ राहुल माळी