मौजे डिग्रजमधून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:33 IST2021-09-16T04:33:10+5:302021-09-16T04:33:10+5:30

सांगली : मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे घरासमोर लावलेली १० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याप्रकरणी वैभव ...

Two-wheeler lamps from Mauje Digraj | मौजे डिग्रजमधून दुचाकी लंपास

मौजे डिग्रजमधून दुचाकी लंपास

सांगली : मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे घरासमोर लावलेली १० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने लंपास केली. याप्रकरणी वैभव शशिकांत दरेगोंड (रा. बसस्थानकाजवळ, मौजे डिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. धनगाव येथील महेश बिराप्पा बन्ने यांनी सोमवारी रात्री फिर्यादीच्या घरासमोर लावली होती.

------

आटपाडी, कवठेमहांकाळला दारू जप्त

सांगली : अवैधरीत्या दारूची विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली आहे. आटपाडी व कवठेमहांकाळ पोलिसांनी तालुक्यात कारवाई करत ३८ बाटल्या दारू जप्त करत विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली. आटपाडी पोलिसांनी १४ बाटल्या जप्त केल्या.

-----

शिराळा, कवठेमहांकाळला जुगार अड्ड्यावर कारवाई

सांगली : जिल्ह्यातील शिराळा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. शिराळा येथे कारवाई करत १६ हजार ३२० रुपये जप्त केले तर कवठेमहांकाळला रोख ९०० रुपये जप्त करत जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली.

------

सह्याद्रीनगरमधून दुचाकी लंपास

सांगली : शहरातील सह्याद्रीनगर येथील ओल्ड मेमन कॉलनी येथून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी अदनान इरफान शरीफ यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. ८ सप्टेंबरच्या मध्यरात्री हा प्रकार घडला.

---------

होम आयसोलेशनमध्ये अवघे ९२० रुग्ण

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट हाेत असून, उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्याही कमी होत आहे. सौम्य लक्षणे असलेले रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असून सध्या ९२० जण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ८ हजारावर रपग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. आता त्यात मोठी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे.

Web Title: Two-wheeler lamps from Mauje Digraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.