सांगलीतून दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:31 IST2021-08-28T04:31:08+5:302021-08-28T04:31:08+5:30
सांगली : शहरातील टिळक चौक परिसरातून १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी आदित्या अशोक नार्वेकर ...

सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील टिळक चौक परिसरातून १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी आदित्या अशोक नार्वेकर (रा. जिवेश्वर कृपा अपार्टमेंट, सांगली) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास लॉक तोडून ही दुचाकी लंपास करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
------
अध्यक्ष बंगल्यासमोरील रस्ता बनला धोकादायक
सांगली : पोलीस मुख्यालयाजवळ असलेला जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वसंत बंगल्यासमोरील रस्ता धाेकादायक बनला आहे. कुपवाडकडे वळणावरच पडलेला मोठा खड्डा व मुरूम रस्त्यावर आल्याने याठिकाणी अनेक वाहनधारक घसरून पडत आहेत. पावसाळ्यात चिखल, तर इतरवेळी मुरूम वर येत असल्याने दुचाकीस्वारांची कसरत होत आहे.
-----
पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाला प्रतिसाद
सांगली : शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेल्या स्वागत कक्षाचा नागरिकांना उपयोग होत आहे. कोरोना संसर्गाची भीती असल्याने याठिकाणी केवळ माहिती घेऊन नागरिक आपली तक्रार दाखल करत असल्याने कमी कालावधीत हे काम पूर्ण होत आहे. पोलीस ठाण्याच्या प्रवेशालाच स्वागत कक्ष असल्याने या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.