पेठजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:00+5:302021-03-24T04:25:00+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील कापूरगावच्या हद्दीत मालट्रकने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी ...

पेठजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
इस्लामपूर : इस्लामपूर-पेठ रस्त्यावरील कापूरगावच्या हद्दीत मालट्रकने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी रात्री झाला. जयदीप रमेश जाधव (वय २२, रा. बेलवडे बुद्रुक, ता. कराड) असे मृताचे नाव आहे.
याबाबत सचिन उत्तम मंडले याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश नानासाहेब माने (वय ४०, रा. हन्नूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या ट्रकचालका विरुद्ध अपघात करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
जयदीप जाधव हा आपल्या दुचाकीवरून (एमएच- ०९ बीएच- ५५९९) इस्लामपूरहून पेठकडे जात होता. यावेळी महेश माने हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच- १२ आरएन- ९०७७) घेऊन पेठहून-इस्लामपूरकडे निघाला होता. कापूरवाडी गावाजवळ भरधाव वेगाने ट्रक चालवीत त्याने जयदीप जाधव याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. त्यामध्ये जयदीप जाधव यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल जाधव अधिक तपास करीत आहेत.