अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:39 IST2021-02-26T04:39:11+5:302021-02-26T04:39:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पलूस : अंकलखोप (ता. पलूस) येथील दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. संग्राम शिवाजी सावंत (वय ...

Two-wheeler killed in unidentified vehicle collision | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क

पलूस : अंकलखोप (ता. पलूस) येथील दुचाकीस्वार अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला.

संग्राम शिवाजी सावंत (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.

याबाबत माहिती अशी की, संग्राम सावंत हा बुधवारी दुचाकीवरून (एम. एच. १० डी. के. ७३८३) पलूस येथे सकाळी दहाच्या सुमारास कामावर आला होता. संध्याकाळी उशिरापर्यंत संग्राम घरी न आल्याने त्याचा भाऊ सागर यांनी रात्री दहाच्या सुमारास दूरध्वनी केला. यावेळी तो दूरध्वनी अनोळखी व्यक्तीने घेतला. या व्यक्तीने आमणापूरदरम्यान कृष्णा कॅनॉलजवळ अपघात झाल्याचे सांगून संग्राम याला पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी नेल्याचे सांगितले. संग्राम याच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर जबर मार बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पलूस पोलिसांत अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler killed in unidentified vehicle collision