येडेनिपाणीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:24 IST2021-01-18T04:24:52+5:302021-01-18T04:24:52+5:30
येलूर येथील संजय जाधव व महेश जाधव दुचाकीवरून (क्र. एमएच १० टी ७२१२) येडेनिपाणीकडे निघाले होते. त्याचवेळी अज्ञात ट्रॅक्टर ...

येडेनिपाणीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार
येलूर येथील संजय जाधव व महेश जाधव दुचाकीवरून (क्र. एमएच १० टी ७२१२) येडेनिपाणीकडे निघाले होते. त्याचवेळी अज्ञात ट्रॅक्टर दोन ट्रेलरमधून कंपोस्ट खत घेऊन येडेनिपाणीकडे चालला होता. येडेनिपाणी फाट्यापासून पुढे समाेर असलेल्या ट्रॅक्टरच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना समाेरुन वैरण घेऊन आणखी एक दुचाकीस्वार अचानक समाेर आला. त्याची धडक चुकविण्याच्या प्रयत्नात जाधव यांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रेलरखाली सापडली. संजय जाधव ट्रेलरच्या चाकाखाली गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासाेबत असणारे महेश जाधव हे किरकोळ जखमी झाले.
संजय जाधव वधू-वर सूचक मंडळाचे काम करत होते. त्यांना दोन लहान मुले असून पत्नीचे निधन झाले आहे. कुटुंबाची जबाबदारी पेलताना चिमुकल्या जिवांना आधार देणाऱ्या संजय यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कुरळप पोलीस ठाण्यात अपघाताची नाेंद झाली असून अधिक तपास आर. एस. जाधव करीत आहेत.