मिरजेत रस्त्यातील खड्ड्यात दुचाकी पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:45+5:302021-09-10T04:33:45+5:30
मिरज : मिरजेत गुरुवारी रात्री वखार भागात महापालिका पंपिंग स्टेशनजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत एक दुचाकीस्वार ...

मिरजेत रस्त्यातील खड्ड्यात दुचाकी पडली
मिरज : मिरजेत गुरुवारी रात्री वखार भागात महापालिका पंपिंग स्टेशनजवळ रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत एक दुचाकीस्वार दुचाकी वाहनासह पडला. या परिसरातील रात्रीच्या वेळी दिवे बंद आहेत. रस्त्यांची मोठी दुरवस्था आहे. महापालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिक संतप्त आहेत.
मिरजेतील प्रभाग पाचमध्ये काँग्रेसच्या चार नगरसेवकांना नागरिकांनी निवडून दिले आहे. मात्र, प्रभागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने नागरिकांना रस्त्याने चालतही जाता येत नाही. वखार भागात मंडले पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी रात्री एक दुचाकीस्वार दुचाकीवरून जाताना अंधारात रस्त्यावरील खड्डा न दिसल्याने तो दुचाकीसह खड्ड्यात पडला. येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांनी दुचाकीस्वारास व खड्ड्यात अडकलेली दुचाकी बाहेर काढली. वखार भागातील रस्ता दुरुस्ती तातडीने करावी, अन्यथा खड्ड्यांमुळे जीव धोक्यात असल्याचे नागरिकांनी सांगितले.