जांभळेवाडी व बिळाशीत दुरंगी लढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:26 IST2021-01-08T05:26:34+5:302021-01-08T05:26:34+5:30

: शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी व बिळाशी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे हे सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी ...

Two-way fight between Jambhalewadi and Bilashit | जांभळेवाडी व बिळाशीत दुरंगी लढती

जांभळेवाडी व बिळाशीत दुरंगी लढती

: शिराळा तालुक्यातील जांभळेवाडी व बिळाशी येथे ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे हे सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले आहे.

बिळाशी येथे आमदार मानसिंगराव नाईक व भाजपचे सत्यजित देशमुख हे दोन गट एकत्र आले असून त्यांच्याविरुद्ध नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत. तसेच महाडिक युवा शक्तीचे एक उमेदवार व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या गटाचे एक उमेदवार यांनी दोन प्रभागात आपली उमेदवारी ठेवली आहे. या गावात १४ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. जांभळेवाडी येथे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ दुरंगी लढत आहे. येथे ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: Two-way fight between Jambhalewadi and Bilashit