मिरजेत दोघा दुचाकी चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:36+5:302021-09-04T04:31:36+5:30
मिरज : मिरज व परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना गांधी चौक पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. नागेश दत्ता ...

मिरजेत दोघा दुचाकी चोरट्यांना अटक
मिरज : मिरज व परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना गांधी चौक पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. नागेश दत्ता माने (रा. कैकाडी गल्ली, मिरज) व नासीर दस्तगीर मुजावर (रा. म्हाडा कॉलनी, इंदिरानगर, मिरज), अशी त्यांची नावे आहेत. या चोरट्यांकडून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या.
गांधी चौक पोलिसांना गुरुवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा संशयिताना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली. यावेळी त्यांनी शहरात विविध ठिकाणी चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरट्यांकडून एम.एच. १० सी.डी. ९४४०, एम.एच. १० टी. ४९६५, एम.एच. १० एक्स ४८३६ व एम.एच. १० डी.यू. ०४२४ या दुचाकी जप्त केल्या आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, सोमनाथ कचरे, सुभाष पाटील, वसंतराव कर्वे, फिरोज हुजरे, बाळासाहेब निळे, दुष्यंत ढेबरे, चंद्रकांत गायकवाड यांनी ही कारवाई केली.