मिरजेत दोघा संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:32 IST2021-09-04T04:32:29+5:302021-09-04T04:32:29+5:30
---------------- बेडगेत तरुणीची आत्महत्या मिरज : बेडग (ता. मिरज) येथे आजाराला कंटाळून मयुरी विशाल धडस (वय २२) या तरुणीने ...

मिरजेत दोघा संशयितांना अटक
----------------
बेडगेत तरुणीची आत्महत्या
मिरज : बेडग (ता. मिरज) येथे आजाराला कंटाळून मयुरी विशाल धडस (वय २२) या तरुणीने गळफास लाऊन आत्महत्या केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे. मयुरी धडस यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. मात्र आजारामुळे काही महिन्यांपासून त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. आजाराला कंटाळून त्यांनी गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय आहे.
-----------
मिरजेत दुचाकी चोरी
मिरज : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारातून मन्सूर दस्तगीर नदाफ यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत नदाफ यांनी गांधी चौक पोलिसांत तक्रार दिली आहे.
------------
अवैध दारूविक्रेत्यास अटक
मिरज : नरवाड (ता. मिरज) येथे बेकायदा देशी दारू विकणाऱ्या रामचंद्र तुळशीराम जाधव (वय ६२, रा. नरवाड) याला मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ८४० रुपयांची देशी दारू जप्त केली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.