एमआयडीसीतील कास्टिंग चोरीप्रकरणी दोन संशयितांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:25 IST2021-01-18T04:25:05+5:302021-01-18T04:25:05+5:30
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीतील सात लाखांच्या कास्टिंगच्या चोरीप्रकरणातील दोन संशयितांना अटक केली. कुपवाड पोलीस ठाण्यातील गुन्हे ...

एमआयडीसीतील कास्टिंग चोरीप्रकरणी दोन संशयितांना अटक
कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील वेस्टर्न प्रेसिकास्ट कंपनीतील सात लाखांच्या कास्टिंगच्या चोरीप्रकरणातील दोन संशयितांना अटक केली. कुपवाड पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. त्यांच्याकडून सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राजेंद्र सुरेश साळुंखे (वय ३६, रा. कुपवाड, मूळ गाव कोडोली, सातारा) व टेम्पोचालक निरंजन तुकाराम चव्हाण (३६, रा. हनुमाननगर, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कुपवाड एमआयडीसीजवळ वेस्टर्न प्रेसिकास्ट या कंपनीत
संशयित राजेंद्र साळुंखे हा १३ वर्षांपासून सुपरवायझर म्हणून नोकरीस आहे. साळुंखे याने शुक्रवारी सकाळी टेम्पोचालक निरंजन चव्हाण याला हाताशी धरून त्याच्या (क्र. एमएच १०, एक्यू ६३२६) या टेम्पोतून कंपनीतील ४ लाख रुपये किमतीचे कास्टिंग मटेरिअल भरून चोरून नेल्याचे उघडकीस आले. याबाबतची तक्रार कंपनीचे एच. आर. मॅनेजर महेश कुलकर्णी यांनी कुपवाड पोलिसांत दिली होती.
त्यानुसार रविवारी सहायक निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, सहायक पोलीस फौजदार युवराज पाटील, बी. के. झांबाडे, गजानन जाधव, सतीश माने, इंद्रजित चेळकर, नामदेव कमलाकर यांनी संशयित साळुंखे याला सातारा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच चोरी प्रकरणातील मुद्देमाल कोल्हापूर येथे लपवून ठेवला असल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडील चार लाखांच्या कास्टिंगसह चोरीतील वाहन असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फोटो : १७ कुपवाड १
ओळ - कुपवाड एमआयडीसीतील
कास्टिंग चोरी प्रकरणातील दोन संशयितांना अटक करून सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक निरज उबाळे, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, आदी.