ऐतवडे खुर्दमध्ये दोघा चंदन चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST2021-02-23T04:42:12+5:302021-02-23T04:42:12+5:30
सांगली : रात्रीच्या वेळेस चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ऐतवडे खुर्द येथे छापा टाकून ...

ऐतवडे खुर्दमध्ये दोघा चंदन चोरट्यांना अटक
सांगली : रात्रीच्या वेळेस चंदनाच्या झाडाची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ऐतवडे खुर्द येथे छापा टाकून अटक केली. अमोल भीमराव पवार (वय २०, रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा), सुनील अनिल शिंदे (२२, मूळ रा. राजाळे, ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील घरफोडी, चोरीच्या घटनांचा छडा लावत आरोपींवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, ऐतवडे खुर्द येथे दोघेजण चंदनाची चोरी करून बुंध्याची साल काढत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याजवळ चंदनाचा बुंधा आढळून आला. त्यांनी कुरळप येथील चौगुले यांच्या शेतातून चंदनाची चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून दोन मोटारसायकलीसह वीस हजार ७०० रुपये किमतीचे चंदन जप्त करण्यात आले. त्यांच्यावर कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मारुती साळुंखे, सुनील चौधरी, कुबेर खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.