सांगलीत चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:31+5:302021-01-03T04:28:31+5:30

सांगली : चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघा संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. सैफ महमद पटेल (२०), समीर रमजान नदाफ ...

Two robbers arrested in Sangli | सांगलीत चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक

सांगलीत चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या दोघांना अटक

सांगली : चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघा संशयितांना शहर पोलिसांनी अटक केली. सैफ महमद पटेल (२०), समीर रमजान नदाफ (३२, दोघेही रा. नळभाग, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री त्यांनी एका तरुणास लुटल्यानंतर पोलिसांनी तातडीने अटकेची कारवाई केली.

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास बसस्थानक परिसरात अरमान खान याच्यावर हल्ला करीत त्याला लुटण्यात आले होते. त्याच रात्री अण्णाभाऊ साठे कमानीजवळ रोहित पाटोळे या तरुणाचा चाकूच्या धाकाने मोबाईल काढून घेण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने शोध सुरू करून दोघांना पकडले. त्यांच्याकडून चोरीची रोकड, मोबाईल जप्त करण्यात आला. संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही खंडणी, मारामारीचे गुन्हे आहेत.

निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडोपंत दोरकर, विक्रम खोत, झाकीर काझी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two robbers arrested in Sangli