मंगळवेढ्याच्या दोन खासगी सावकारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:29+5:302021-07-07T04:33:29+5:30

पोलिसांच्या माहितीनुसार, उमदी येथील रमेश शेवाळे या शेतकऱ्याने २०१४ मध्ये वडिलांच्या नावे असलेली जमीन मंगळवेढा येथील नंदकुमार पवार ...

Two private moneylenders arrested on Tuesday | मंगळवेढ्याच्या दोन खासगी सावकारांना अटक

मंगळवेढ्याच्या दोन खासगी सावकारांना अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, उमदी येथील रमेश शेवाळे या शेतकऱ्याने २०१४ मध्ये वडिलांच्या नावे असलेली जमीन मंगळवेढा येथील नंदकुमार पवार व आसबेवाडी येथील संतोष खटकाळे यांना लिहून देऊन चार टक्के व्याजाने तीन लाख रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात त्यांना व्याजाचे आठ लाख रुपये परत दिले होते. मात्र पैसे देऊनही या दोन्ही सावकारांनी रमेश यांना वारंवार फोनवरून शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देत पैशाची मागणी केली होती. त्यांच्या तगाद्याने व दमदाटीमुळे मानसिक त्रास होऊन रमेश यांनी आत्महत्या केल्याचे त्यांचे वडील मारुती शेवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी नंदकुमार पवार व संतोष खटकाळे यांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे अधिक तपास करीत आहेत.

चौकट

आणखी काही खासगी सावकार ‘रडार’वर

रमेश शेवाळे यांच्या आत्महत्येप्रकरणी आणखी काही खासगी सावकारांची माहिती घेत असून, जे कोणी दोषी आढळून येतील, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपनिरीक्षक नामदेव दांडगे यांनी दिला आहे.

Web Title: Two private moneylenders arrested on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.