दोन पोलीस अधिकारी सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:02+5:302021-05-01T04:26:02+5:30
सांगली : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले दोन पाेलीस अधिकारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या उपस्थितीत ...

दोन पोलीस अधिकारी सेवानिवृत्त
सांगली : जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले दोन पाेलीस अधिकारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला. याशिवाय, पदोन्नतीवर धुळे येथे बदली झालेल्या उपअधीक्षक किशोर काळे यांचाही सत्कार करण्यात आला.
जिल्हा पाेलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी दरेकर व उपनिरीक्षक बाळासाहेब माळी हे सेवानिवृत्त झाले.
दरेकर यांनी सांगली शहर, मिरज शहर, विश्रामबाग याठिकाणी सेवा बजावली होती, तर माळी यांनी मिरज शहर, विश्रामबाग, सांगली शहर, मिरज वाहतूक व सांगली वाहतूक शाखा येथे काम केले, त्यांनी एकूण ३९ वर्षे सेवा बजावली आहे.
पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.
पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना नुकतीच पदोन्नती मिळाली असून आता ते धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी रुजू होणार आहेत. त्यांनाही शुक्रवारी निरोप देण्यात आला.
यावेळी एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, अनिल तनपुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.