शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लिलावात मोटार देतो सांगून १२ लाखांचा गंडा; सांगली, भिवंडीतील दोघांविरुद्ध सांगलीत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:33 IST

सतत टोलवाटोलवी

सांगली : लिलावात मोटार देतो सांगून सांगलीतील मेडिकल व्यावसायिक महावीर काशाप्पा आलासे (वय ५५, रा. शिंदे मळा) यांची १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संशयित अनिल शिवराम कोंडा (रा. पद्मानगर, भिवंडी, ठाणे), गणेश सुरेश पाटील (रा. अरिहंत कॉलनी, सांगली) या दोघांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.महावीर आलासे यांची एक वर्षापूर्वी गाड्यांची देवघेव करणाऱ्या गणेश पाटील याच्याशी ओळख झाली होती. आलासे यांनी त्यांच्या वापरासाठी मोटार घ्यायची आहे असे सांगितले होते. तेव्हा गणेश याने अथर्व मोटर्सचे मालक अनिल कोंडा यांच्याकडे लिलावात गाडी ठेवली आहे. आवडली तर ॲडव्हान्स रक्कम पाठव असे सांगितले. गाडीचे फोटो बघितल्यानंतर २३ ऑक्टोबर २०२० मध्ये दोन लाख रुपये त्यानंतर २९ रोजी पाच लाख रुपये तर १० नोव्हेंबर २०२० रोजी पुन्हा पाच लाख रुपये असे १२ लाख रुपये कोंडा याच्या बँक खात्यावर पाठवले.रक्कम पाठवल्यानंतर गणेश याने आलासे यांना भिवंडी येथे लिलावास जावे लागेल असे सांगितले. त्यामुळे ११ नोव्हेंबर २०२० रोजी कोंडा याला कॉल केला. परंतु, त्याने वारंवार कॉल करूनही तो उचलला नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर कोंडा याने आलासे यांना, गणेश पाटील हा मोटार व पाच लाख रुपये घेऊन गेल्याचे सांगितले. त्यामुळे आलासे यांनी गणेशकडे पाठपुरावा केला.त्याने आज-उद्या जाऊ असे म्हणत सतत टोलवाटोलवी केली. त्याच्या घराकडे जाऊन सतत विचारणा केल्यानंतर गणेशच्या पोलिस वडिलांनी देखील पुन्हा इकडे फिरकायचे नाही असे सांगितले. दोघांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे आलासे यांनी कोंडा व गणेश याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.