शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
5
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
6
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
7
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
8
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
9
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
10
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
11
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
13
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
14
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
15
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
16
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
17
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
18
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
19
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
20
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

Sangli: नादुरुस्त डम्परमुळे दोन अपघात; दोघे जागीच ठार, तिघेजण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 15:35 IST

खंबाळे हद्दीत १२ तासांतील दुर्घटना

विटा : खानापूर तालुक्यातील खंबाळे (भा.) गावच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला निष्काळजीपणे उभ्या केलेल्या नादुरुस्त डम्परमुळे १२ तासांत दोन भीषण अपघात झाले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. एकाच डम्परमुळे हे दोन्ही अपघात झाल्याने रस्ते सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.विटा ते आळसंद रस्त्यावर खंबाळे गावच्या हद्दीतील चक्रधारी यंत्रमाग कारखान्याजवळ डम्पर (एमएच १० सीआर ८७०७) रस्त्याच्या बाजूला नादुरुस्त अवस्थेत उभा होता. दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता महेंद्र पांडुरंग शितोळे (वय ३५, रा. शिवाजीनगर, विटा) हे दुचाकीवरून (एमएच१० डीई ७६९९) विटाकडे जात होते. त्यावेळी शितोळे यांची दुचाकी थेट रस्त्याकडेला उभा असलेल्या डम्परच्या मागील उजव्या भागावर आदळली. या भीषण धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्याचदिवशी रात्री ८:३० वाजता पुन्हा त्याच ठिकाणी आळसंदहून विट्याकडे येत असलेली चारचाकी (एमएच१० एजी २७३४) अंधारात डम्पर न दिसल्याने त्याच डम्परवर पाठीमागून आदळली. त्यानंतर ही चारचाकी विट्यावरून आळसंदकडे जाणाऱ्या मोटारीला (एमएच- १६ डीजी - ५६७०) धडकली. या धडकेत चारचाकी चालक आस्लम गुलाब मुलाणी (रा. आळसंद) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील वहिदा आस्लम मुलाणी, अल्ताफ आस्लम मुलाणी आणि तन्जिला सरफराज मुजावर (सर्व रा. आळसंद) हे गंभीर जखमी झाले. या अपघातात मोटार आणि चारचाकी दोन्हीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या दोन्ही अपघातांची नोंद विटा पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी डम्पर (एमएच१० सीआर ८७०७) च्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

डम्परचालकाचा निष्काळजीपणाडम्परला वाहनचालकाने निष्काळजीपणे नादुरुस्त अवस्थेत उभा केले होते. तसेच डम्परवर पार्किंग लाइट, रेडिएटर चेतावणी किंवा दिशादर्शक फलक लावलेलेही नव्हते. यामुळेच दोन अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत, म्हणून प्रशासनाने रस्त्यावर नादुरुस्त वाहने उभी करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे मत स्थानिकांनी व्यक्त केले.