सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोना बाधित ; ११२ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 11:41 IST2020-05-31T11:40:27+5:302020-05-31T11:41:28+5:30
सांगली: जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी दोनने वाढ झाली. मणदुर तालुका शिराळा येथील ८१ वर्षीय पुरुष कोरोणा बाधित मुंबईवरून ...

सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोना बाधित ; ११२ जण बाधित
ठळक मुद्देदरम्यान, सध्या जिल्ह्यात ११२ कोरोना बाधित असून यातील ४९ जणांवर उपचार सुरू आहेत.
सांगली: जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी दोनने वाढ झाली. मणदुर तालुका शिराळा येथील ८१ वर्षीय पुरुष कोरोणा बाधित मुंबईवरून आलेल्या मुलाच्या संपर्कात होते.
तसेच दत्त काॅलनी , मालगाव रोड , मिरज येथील ६७ वर्षीय पुरुष कोरोणा बाधित. ॲम्बुलन्स मधून चौघेजण दिनांक २७ मे रोजी मुंबईवरून आले होते.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात ११२ कोरोना बाधित असून यातील ४९ जणांवर उपचार सुरू आहेत.