महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:30+5:302021-05-22T04:25:30+5:30
सांगली : शहरातील श्यामरावनगर येथील सहारा कॉलनीमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवूनही लग्नास नकार देत छळ करण्यात येत होता. या ...

महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक
सांगली : शहरातील श्यामरावनगर येथील सहारा कॉलनीमध्ये राहणाऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवूनही लग्नास नकार देत छळ करण्यात येत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने केलेल्या आत्महत्येप्रकरणी मुख्य संशयित सागर हणमंत खाडे (वय २९) आणि त्याचा मित्र उदय दत्तात्रय घाडगे (वय ३५) यास अटक करण्यात आली. सोमवारी सरोजिनी गजानन आवळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आत्महत्या केलेल्या सरोजिनी व संशयित सागर यांच्यात प्रेमसंबंध होते. सात वर्षांपासून संबंध असतानाही तो लग्नास नकार देत होता व सरोजिनी यांना मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करीत होता. संशयित सागरचा मामा सुरेश जगदाळे व त्याच्या इतर तीन मित्रांनी तिच्या सोबत लग्न करायचे नाही असे म्हणून मयत सरोजिनी यांना त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून सरोजिनी यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित व त्याच्या मित्राला शहर पोलिसांनी अटक करीत न्यायालयात हजर केले. दोघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, गुन्हा दाखल होताच संशयित खाडे याचा मामा सुरेश हणमंत जगदाळे हा पसार झाला आहे. सांगली शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.