कासेगावात दोघा मटका एजंटांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:04+5:302021-04-20T04:29:04+5:30
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे ‘लोकमत’च्या दणक्यानंतर कासेगाव पोलिसांनी दोन मटका एजंटांवर धडक कारवाई केली. यावेळी त्यांना ...

कासेगावात दोघा मटका एजंटांना अटक
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे ‘लोकमत’च्या दणक्यानंतर कासेगाव पोलिसांनी दोन मटका एजंटांवर धडक कारवाई केली. यावेळी त्यांना अटक करून रक्कम व मुद्देमाल जप्त केला. चंद्रकांत किसन आडके व प्रकाश बाळासाहेब येडेकर अशी त्यांची नावे आहेत.
‘कासेगावात संचारबंदी डावलून अवैध व्यवसाय’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये सोमवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याच गावात हे बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. या दणक्यानंतर कासेगाव व परिसरातील अनेक मटका चालकांनी धूम ठोकली. कासेगाव पोलिसांनी कासेगाव, नेर्ले व इतर परिसरात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी कासेगाव येथील चंद्रकांत किसन आडके, प्रकाश बाळासाहेब येडेकर यांना अटक करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम व चिठ्ठ्या पोलिसांनी जप्त केल्या.
चौकट
अमर, अकबर, अँथोनीचे धाबे दणाणले
कासेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे अमर, अकबर, अँथोनी हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर चर्चेत आले आहेत. त्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. भीती दाखवून सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक करण्यात तरबेज असणाऱ्या या तिघांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.