वाहनाच्या धडकेत दोन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:25 IST2021-08-29T04:25:53+5:302021-08-29T04:25:53+5:30
सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर असलेल्या आदिसागर मंगल कार्यालयासमोर भरधाव वाहनाच्या धडकेत दोन्ही वाहनांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. ...

वाहनाच्या धडकेत दोन लाखांचे नुकसान
सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर असलेल्या आदिसागर मंगल कार्यालयासमोर भरधाव वाहनाच्या धडकेत दोन्ही वाहनांचे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी सूरज नजीम मुल्ला (रा. रामरहिम कॉलनी, सांगली) यांनी दीपक आप्पासाहेब सावंत (रा. रविकीरण डेअरीमागे, सांगली) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साक्षीदार तपासले आहेत.
-------------
जुन्या कुपवाड रोडवरून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील जुना कुपवाड रोड ते लक्ष्मी मंदिर रोडवर असलेल्या कुंभार आर्थोपेडिक रुग्णालयासमोरून १५ हजार रुपये किमतीची दुचाकी लॉक तोडून लंपास करण्यात आली. याप्रकरणी औषध प्रतिनिधी असलेले प्रवीण हरीभाऊ खोकडे (रा. हरिपूर) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. शुक्रवार दि. २७ रोजी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.
-------------
सांगलीतून दुचाकी लंपास
सांगली : शहरातील स्वरूप टॉकीजजवळून चोरट्यांनी १० हजार रुपये किमतीची मोटारसायकल लंपास केली. याप्रकरणी सुहास परशुराम जाधव (रा. विजापूर वेस, मिरज) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे.