कुपवाडमध्ये दोन लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:18 IST2021-07-19T04:18:28+5:302021-07-19T04:18:28+5:30
कुपवाड : शहरातील मध्यवर्ती वस्तीत असणाऱ्या तराळ गल्लीतील तय्यब गफूर जमादार यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीत ...

कुपवाडमध्ये दोन लाखांची घरफोडी
कुपवाड : शहरातील मध्यवर्ती वस्तीत असणाऱ्या तराळ गल्लीतील तय्यब गफूर जमादार यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख १ लाख ७३ हजार रुपये असा एकूण दोन लाख एक हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
तय्यब जमादार हे बुधवार दि. १४ रोजी घराला कुलूप लावून कुटुंबासह परगावी गेले होते. शनिवारी सकाळी जमादार कुटुंब परगावाहून आल्यावर घराचे कुलूप तोडल्याचे त्यांना दिसले. घरात जाऊन पाहिले असता चोरट्यांनी तिजोरी तोडून त्यातील सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह दोन लाख एक हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याचे निदर्शनास आले. याबाबतची जमादार यांनी शनिवारी रात्री उशिरा कुपवाड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.