शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Sangli Accident: मदतीला गेला अन् जीव गमावला; अथणीजवळ दोन अपघातात तिघेजण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 14:32 IST

मृत दोघे शिरोळचे, एकजण कवलापूरचा

अथणी : कर्नाटकातील कागवाड-विजापूर राज्य मार्गावर मुरगुंडी गावाजवळ बनजवाड पीयू कॉलेजजवळ गुरुवारी मध्यरात्री जोरदार पावसात चिरा घेऊन जाणारा ट्रक आणि उसाचे बियाणे भरून जाणारी पिकअप यांच्यात धडक होऊन दोघेजण ठार झाले.अपघातानंतर बचाव करण्यास गेलेल्या एकास मोटारीने ठोकरल्याने तो देखील ठार झाला. शुभम युवराज चव्हाण (वय २४, रा. कुटवाड, ता. शिरोळ), महेश सुभाष गाताडे (वय ३०, रा. गणेशवाडी, ता. शिरोळ) आणि सचिन विलास माळी (वय ४२, रा. कवलापूर, ता. मिरज) अशी मृतांची नावे आहेत.घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, रत्नागिरी येथे चिरा भरलेला ट्रक (केए २८ एए ५३८१) हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास विजापूरकडे निघाला होता. त्याचवेळी अथणी येथून उसाची रोपे भरलेली पिकअप जीप (एमएच १० सीआर ९८७७) कागवाडकडे जात होती. भरपूर पाऊस सुरू असल्यामुळे समाेरील वाहने दिसण्यास अडथळा येत होता.चिरा भरलेल्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. चौदा चाकांच्या अवजड ट्रकने पिकअपला धडक दिल्यानंतर दोन्ही वाहने उलटली. यामध्ये पिकअपमधील शुभम चव्हाण आणि महेश गाताडे हे दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.यावेळी मिरज तालुक्यातील कवलापूर येथील सचिन माळी हे चौघांना घेऊन कुणाळा (ता. अथणी) येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी मोटार (एमएच ११ वाय ६०५०) मधून जात होते. वाटेत अपघात झाल्याचे पाहून मदतकार्यासाठी माळी खाली उतरले. त्याचवेळी अथणीहून कागवाडकडे जाणारी मोटार (केए २२ एमसी ९२५१) ने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर मोटार अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. अपघातानंतर माळी यांचे नातेवाईक मोटारीतून गडबडीत खाली उतरताना अंधारात खाली पडून किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर अथणीचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उपार आणि पोलिस पथक घटनास्थळी धावले. पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे रस्त्यावर नियंत्रण ठेवून पंचनामा करताना कसरत करावी लागली. यावेळी रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती. मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मदतीला गेला अन् जीव गमावलाकागवाड-विजापूर रस्त्यावर दोन वाहनांचा अपघात झाल्यानंतर मदतीसाठी म्हणून सचिन माळी (रा. कवलापूर) हे मोटारीतून खाली उतरले. परंतु त्याचवेळी भरधाव वाहनाने त्यांना धडक दिल्यामुळे ते ठार झाले. माळी यांचा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच कवलापूर येथे शोककळा पसरली होती.