शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: रस्त्याकडेला बोलत उभे राहणे जीवावर बेतले; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार, कार चालक पसार

By श्रीनिवास नागे | Updated: May 9, 2023 16:28 IST

अज्ञात वाहनाचा पाठलाग केला. परंतु ते वाहन सापडले नाही

खानापूर (जि. सांगली) : खानापूर तालुक्यातील भिवघाटजवळ तासगाव रस्त्यावर अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने केबल वाहिनीच्या कामावरील दोघे कामगार ठार झाले. नागेश लक्ष्मण जाधव (वय ३८, रा. रामपूर, ता. सिंदगी, जि. विजयपूर) व अनिल रामू चव्हाण (१८, रा‌. केरुरगी, ता. सिंदगी, जि‌. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत.मुकादम जयसिंग धनसिंग राठोड यांनी अपघाताची फिर्याद दिली. अपघातग्रस्त कामगार ‘बीएसएनएल’च्या केबल वाहिनीचे काम करण्यासाठी करंजे येथे आले होते. भिवघाट ते करंजे रस्त्याच्या कडेला भिवघाट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कमानीशेजारी हे काम सुरू होते. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता काम संपवून अपघातग्रस्त कामगार रस्त्याच्या बाजूला बोलत उभे होते.यावेळी तासगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने नागेश जाधव व अनिल चव्हाणला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेजण चिरडले गेले. दोघांच्या डोक्यास गंभीर मार लागला. नागेश जाधव जागीच ठार झाला, तर अनिल चव्हाणला रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.अज्ञात वाहन अपघातस्थळी न थांबता वेगात निघून गेले. यावेळी तेथे उपस्थित असेलेले जयसिंग राठोड ओरडल्यामुळे घटनास्थळी कंपनीचे अभियंते व काही लोक आले. त्यांनी अज्ञात वाहनाचा पाठलाग केला. परंतु ते वाहन सापडले नाही. अपघाताची नोंद खानापूर पोलिसांत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक टी. डी. नागराळे, संतोष घाडगे, लक्ष्मण गुरव पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू