जतमध्ये दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना १५ महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:17 IST2021-07-23T04:17:34+5:302021-07-23T04:17:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : जत येथील निगडी कॉर्नर येथे एका किराणा दुकानावर दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना ...

जतमध्ये दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना १५ महिने कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : जत येथील निगडी कॉर्नर येथे एका किराणा दुकानावर दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना १५ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. सिद्धार्थ दत्ता चव्हाण (वय १९) व बाबू विष्णू काळे (२९, दोघेही रा. जत) अशी आरोपींची नावे आहेत. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले.
खटल्याची माहिती अशी की, १६ जून २०१८ रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास आरोपींनी जत येथील निगडी कॉर्नरवर असलेल्या भाग्यश्री किराणा स्टाेअर्स या दुकानावर दरोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. फिर्यादी प्रज्वल श्रीमंत साळे यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली होती. उपनिरीक्षक एस. टी. गढवे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात सहा साक्षीदार तपासण्यात आले व साक्षीपुराव्याच्या आधारे आरोपींना शिक्षा सुनाविण्यात आली.