सांगलीत आयपीएलवर सट्टा घेणारे दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST2021-04-30T04:35:10+5:302021-04-30T04:35:10+5:30
सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांवर सट्टा घेण्यात येत असल्याने यापूर्वीही दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशा सट्टा घेणाऱ्यांवर ...

सांगलीत आयपीएलवर सट्टा घेणारे दोघे अटकेत
सध्या सुरू असलेल्या आयपीएल सामन्यांवर सट्टा घेण्यात येत असल्याने यापूर्वीही दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशा सट्टा घेणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत.
त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी खास पथक तयार केले आहे. हे पथक शहरात माहिती घेत असताना, ओंकार चिकली हा लक्ष्मीनारायण कॉलनीमधील आपल्या घरात सट्टा घेत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने ओंकारच्या घरावर छापा टाकला असता, तो बेटींग घेताना आढळून आला. मोबाइलवर बोलत वहीमध्ये नोंद घेत ते सट्टा घेत होते. दोघा संशयितांकडून दोन मोबाईल, हिशेब वही व इतर साहित्य असा ११ हजार ५०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित सावंत, सुभाष सूर्यवंशी, जितेंद्र जाधव, राजू मुळे, संजय कांबळे, राहुल जाधव, शशिकांत जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.