विट्याजवळ दुचाकी धडकेत दोघे जखमी

By Admin | Updated: September 16, 2015 00:17 IST2015-09-16T00:02:21+5:302015-09-16T00:17:25+5:30

जखमी खंबाळेचे : पोलिसात नोंद

Two injured in a wheelchair near Viatya | विट्याजवळ दुचाकी धडकेत दोघे जखमी

विट्याजवळ दुचाकी धडकेत दोघे जखमी

विटा : विट्याहून नागराळेकडे निघालेली एसटी बस व खंबाळे (भा.)हून विट्याकडे येणाऱ्या दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. शुभम महादेव सुर्वे (वय १७) व प्रताप भिकू सुर्वे (४३, दोघेही रा. खंबाळे-भा.) अशी अपघातात जखमी झालेल्या चुलता-पुतण्याची नावे आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास विटा-कुंडल रस्त्यावरील आदर्श शैक्षणिक संकुलाजवळ घडली.
खंबाळे (भा.) येथील प्रताप सुर्वे व शुभम सुर्वे मंगळवारी सकाळी दुचाकीवरून (क्र. एमएच ११ एयु ५४०६) विट्याकडे येत होते, तर विटा आगाराची एसटी बस (क्र. एमएच १२-७६९१) नागराळेकडे निघाली होती. ही दोन्ही वाहने आदर्श शाळेजवळच्या शिंदे वस्तीवर आली असताना, त्यांची धडक झाली. या अपघातात शुभम व प्रताप सुर्वे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने कऱ्हाडला नेण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Two injured in a wheelchair near Viatya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.