मोरेवाडीच्या सरपंचासह दोनशे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:28 IST2021-04-07T04:28:48+5:302021-04-07T04:28:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : मोरेवाडी (ता. शिराळा) येथील लोकनियुक्त सरपंच अशोक डिगे व सदस्य राजाराम भोसले यांनी २०० ...

Two hundred activists including Sarpanch of Morewadi joined NCP | मोरेवाडीच्या सरपंचासह दोनशे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मोरेवाडीच्या सरपंचासह दोनशे कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : मोरेवाडी (ता. शिराळा) येथील लोकनियुक्त सरपंच अशोक डिगे व सदस्य राजाराम भोसले यांनी २०० कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन आमदार मानसिंगराव नाईक यांनी प्रवेश घेऊन भाजपला जोरदार धक्का दिला आहे.

चिखली (ता. शिराळा) येथील आमदार नाईक यांच्या निवासस्थानी जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम झाला. सरपंच अशोक डिगे व सदस्य राजाराम भोसले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

मोरेवाडी ही देशमुख गटाची हुकमी समजली जाणारी ग्रामपंचायत आमदार गटात आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. एकूण चार सदस्य असणारी ही ग्रामपंचायत यातील तीनही सदस्य राष्ट्रवादीचे आल्याने एकतर्फे ग्रामपंचायत ही राष्ट्रवादीची झाली आहे.

यावेळी राजाराम भोसले, शामराव भोसले, शंकर जाधव, रंगराव भोसले, जालिंदर भोसले, श्रीपती डिगे, ज्ञानदेव जाधव, संदीप दिघे, अर्जुन सावंत, राजेंद्र जाधव, आनंदा जाधव, उमेश मोरे, आबा भोसले, बाळासाहेब चौगुले, पोपट सावंत, अक्षय जाधव, विलास जाधव, विशाल सपाटे, सागर सावंत या कार्यकर्त्यानीही प्रवेश केला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास घोडे-पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान संपतराव जाधव, विजय चव्हाण, संतोष चव्हाण, धनाजी जाधव उपस्थित होते.

Web Title: Two hundred activists including Sarpanch of Morewadi joined NCP